जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण

शेळके-कानवडेंविरोधात कर्डिलेंनी ठोकले शड्डू

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची कामधेनूमानल्या जाणार्‍या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत सध्या श्रेयाचे भांडण रंगले आहे.या बँकेवर जिल्ह

आमदार काळेंच्या निधीतून 84 लाखांच्या कामांना मान्यता
स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन
गोधेगाव शाळेतील माजी विद्यार्थी 18 वर्षांनी आले एकत्र

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची कामधेनूमानल्या जाणार्‍या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत सध्या श्रेयाचे भांडण रंगले आहे.या बँकेवर जिल्ह्यातील सर्वपक्षीय संचालक आहेत. बँकेत प्रवेश केला की ते आपापलेराजकीय जोडे बाहेर काढून ठेवतात व फक्त शेतकरी हिताच्या निर्णयांनाप्राधान्य देतात, असेही आवर्जून सांगितले जाते. मात्र, आता राष्ट्रवादीचे अध्यक्षअ‍ॅड. उदय शेळके व काँग्रेसचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांच्याविरोधातभाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी शड्डू ठोकले आहेत. विषयकर्जमर्यादा वाढीचा आहे व हा निर्णय आपल्यामुळे झाल्याचा कर्डिलेंचा दावाआहे तर हा निर्णय सर्व संचालक मंडळाचा असल्याचा अ‍ॅड. शेळके वकानवडेंचे म्हणणे आहे. मात्र, आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाची चिन्हेदिसू लागली आहेत.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना वीस हजारऐवजी तीसहजार रुपये कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे. हा निर्णय झाल्यानंतर सोशलमिडियावर तो व्हायरल झाला. पण यामुळे या निर्णयाचे श्रेय हातून जात असल्याच्याभावनेने अध्यक्ष अ‍ॅड. शेळके व उपाध्यक्ष कानवडे यांनी, कर्जवाढीचा निर्णयसर्व संचालकांचा असल्याचे घाईघाईने स्पष्ट केले. मात्र, त्यावर पलटवार करीतकर्डिलेंनी फक्त अध्यक्ष-उपाध्यक्षच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच दिग्गज नेत्यांवर सूचकशब्दात निशाणा साधला आहे.

त्यांच्या पोटात गोळा

जिल्ह्या बँकेत माझ्यामुळेच कर्ज मर्यादा वाढविण्याचा निर्णयझाला असून त्यामुळेच जिल्ह्यातील साखर सम्राटांच्या पोटात गोळा आला आहे. मीघेतलेला निर्णय अंतिम होऊन जाहीर झाला असल्याने साखर सम्राटांना जड जातअसल्यामुळे बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांना प्रसिद्धी पत्रक काढण्याची वेळ आली असल्याचे कर्डीलेयांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना वीस हजार ऐवजी तीस हजाररुपये कर्ज मर्यादा वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावल्यामुळे नगर तालुक्यातीलग्रामस्थांनी कर्डिले यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, पेपरला बातमीवाचल्यामुळे बॅकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष यांना प्रसिद्धी पत्रक काढले. मी अगोदरस्टेटमेंट केल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच त्यांच्या नेतेमंडळींचे मनदुखावले असेल. यामुळे हे प्रसिध्द पत्रक काढले. जिल्हा बँकेच्या बोर्डवर एखादाविषय आल्यानंतर कार्यकारी संचालक विषय वाचवून दाखवतात, त्या विषयावर भूमिकामांडण्याचे काम कोणाला तरी करावे लागते. ते काम मी केले. वीस हजाररुपयावरून तीस हजार रुपये कर्जमर्यादा वाढवण्याची मागणी मी केली व ही मागणी सर्वसंचालकांनी मान्य केली, असे सांगून ते म्हणाले, जिल्हा बँकेचे सर्व निर्णय चेअरमन,व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ एकत्र येऊन निर्णय घेतात. जिराईत, भागातीलशेतकरी, बागायतदार, कारखानदार तसेच छोटे-मोठे व्यवसाईक यांना सर्वसंचालक मंडळ मदत करतात. पण, माझा निर्णय सोशल मिडीयाच्या माध्यमातूनलोंकापर्यत लवकर पोहचला. या निर्णयाचे नेते मंडळींना दङपण आल्यामुळेत्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांना बँकेचे प्रसिद्ध पत्रक काढण्यास भाग पाडले, असादावाही कर्डिलेंनी केला.

निर्णय संचालकांचा

कर्ज मर्यादा एकरी वीस हजारावरून तीस हजार करण्याबाबत सर्वसंचालकांनी सूचना केल्या आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याचे श्रेयकोणा एका संचालकाला नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. शेळकेयांनी दिले आहे. शेतकर्‍यांना एकरी कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा व जोडीनेपशुधनासाठीच्या कर्जाचा विषयही मांडला गेला. पीक कर्जाची एकरी मर्यादा वीसहजाराहून तीस हजार करण्याचा निर्णय त्यामुळेच आम्ही सर्व संचालकांच्या मागणीनुसारआणि चर्चेनुसार घेतला असल्याचे शेळके यांनी सांगितले. दरम्यान, पीक कर्ज मर्यादावाढीच्या या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून शेळके-कानवडे विरोधात कर्डिलेअसा वाद आता रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

त्याचा रोख कुणाकडे?

पीक कर्ज मर्यादा वाढवण्याच्या निर्णयाचे श्रेय सर्वसंचालकांना देणारे अध्यक्ष अ‍ॅड. शेळके यांनी सूचक शब्दात बोलताना, काहीतालुक्यांमध्ये गरज नसताना पशुपालनासाठी कर्ज वाटले गेले असून त्यांचीथकबाकी वाढत चालली असल्याबद्दल आपणास चिंता असल्याचे स्पष्ट केले तसेच पशुपालनकर्ज वाटप झालेले काही तालुके पुढील दोन-तीन वर्षे शेती कर्जालामुकण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पशुपालन कर्ज वाटणारेसंचालक कोण, त्यांच्याकडील थकबाकीला जबाबदार कोण, असाही प्रश्‍न निर्माण झालाआहे. त्यामुळे आता यावर माजी आमदार कर्डिलेंचे भाष्य उत्सुकतेचे असणार आहे.

COMMENTS