जात स्पष्ट करणारी आडनावे बदला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जात स्पष्ट करणारी आडनावे बदला…

पीपल्स हेल्पलाईन करणार जागृती, अधिकार वापरण्याचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी : व्यक्तीची जात ही स्पष्ट रितीने त्याच्या आडनावातून स्पष्ट होते. काही आडनावे व्यक्तीचे सामाजिक अवमूल्यन करतात किंवा त्यातून जातीचा

दैनिक लोकमंथन l परदेशातून पन्नास हजार टन ऑक्सिजनची आयात
यशोधन कार्यालयाकडून काकडवाडीतील आदिवासी कुटुंबास मदत
संगमनेर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी : व्यक्तीची जात ही स्पष्ट रितीने त्याच्या आडनावातून स्पष्ट होते. काही आडनावे व्यक्तीचे सामाजिक अवमूल्यन करतात किंवा त्यातून जातीचा दुर्गंध हा इतरत्र पसरतो, असा दावा येथील पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद संघटनेने केला आहे व या कारणासाठी संघटनेने ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहीम हाती घेतली असल्याचे संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.
ज्या आडनावामुळे जात स्पष्ट होते व मानवी सामाजिक अवमूल्यन होते, अशी सर्व आडनावे कायद्याने बदलण्याचा अधिकार व्यक्तीला आहे. एका चळवळीद्वारे अशी आडनावे सोयीस्कररितीने बदलता येणार आहे. त्यासाठी एकाच वेळेला सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्धी, रेशन कार्डावर आडनाव नोंदीचा बदल, जातीच्या दाखल्यावर आडनाव बदल अशा सर्व गोष्टी कायद्याने करता येणार आहेत, असेही अ‍ॅड. गवळी यांनी स्पष्ट केले. भारतातील वर्ण आणि जाती व्यवस्थेमुळे माणसाचे सामाजिक अवमूल्यन होते. याला व्यक्तीचे आडनाव कारणीभूत ठरते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही वर्ण आणि जातीव्यवस्था मोठ्या प्रमाणावर टिकून आहे. जातीव्यवस्थेला खतपाणी घालण्यासाठी भारतातील राजकारणी कारणीभूत ठरतात. त्याशिवाय दरवर्षी लाखो लोक जातीवर आधारित आरक्षण मागण्यांसाठी मोर्चे-आंदोलने करतात. एकंदरीत जातव्यवस्था मोडीत काढण्याएवजी आज देखील त्या प्रबळ ठरत आहे. राजकारण्यांनी जात व्यवस्था मोडीत काढण्यासाठी कायदे करण्याची मानसिक तयारी दाखवलेली नाही, असा दावा करून अ‍ॅड. गवळी म्हणाले, जातीव्यवस्थेचे मूळ हे नॉन जेनेटिक इन्फर्मेशन तंत्रामध्ये आहे. ज्या समाजात मुला-मुलींचे संगोपन होते, त्याशिवाय आजूबाजूचा परिसर याबाबी जातसंस्था बळकट करण्यास कारणीभूत ठरतात.पण जातीची मुळं समाजाच्या इतर घटकांमध्ये जेवढे आहे, त्याच्या शेकडो पटीने व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये असल्याचे मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहीम सुरू झाली असून, सामाजिक अवमूल्यन करणारी आडनावे कायद्याने बदलण्याचा अधिकार असल्याबाबत जनजागृती यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS