महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळविले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळविले

अहमदनगर/प्रतिनिधी : रस्त्याने धूम स्टाईलने हॉस्पीटलच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटयांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड तोळ

इराणीं’चे अज्ञान की असंवेदनशीलता ? 
सांगलीत 2 कोटी 45 लाखांच्या रक्तचंदनाचा साठा जप्त
काकाला नाही झाली सहन पुतण्याने केलेली चोरी…

अहमदनगर/प्रतिनिधी : रस्त्याने धूम स्टाईलने हॉस्पीटलच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटयांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सुमारे साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण ओढून, तोडून लुटून नेले. पल्सर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेले दोघे चोरटे धूम स्टाईलने लगेच फरार झाले.
या प्रकरणी राहता पोलिसांनी स्वाती संदीप शिंदे (रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा) या विवाहितेच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्यांविरूद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 394, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राहाता पोलिस करीत आहेत. या घटनेने राहाता परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्याने पायी जाणार्‍या एकट्या-दुकट्या महिला पाहून त्यांच्या गाळ्यातील दागिने ओरबाडण्याचे वाढते प्रकार महिलांमध्ये भीती पसरवून जाऊ लागले आहेत.

COMMENTS