Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘किसन वीर’च्या कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे

वाई / प्रतिनिधी : भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या थकित पगारांसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ठिय्

 हिंगणघाट तालुक्यातील परिसरात वादळी वाऱ्यासह  अवकाळी पावसाला सुरुवात 
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी
महाबळेश्‍वर तालुक्यातील दळण-वळण राडारोड्यातून होणार

वाई / प्रतिनिधी : भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या थकित पगारांसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज तिसर्‍या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पगारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवार (ता. 21) पासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनात सुमारे ारशे कामगार सहभागी झाले होते. आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता. दुपारी चार वाजता कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी कामगार प्रतिनिधींनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले. भोसले यांनी कामगार प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली.
तुमच्या सर्व मागण्या ज्ञात आहेत. त्या अवास्तव नाहीत. 27 टक्के वेतनवाढीचा प्रश्‍न महिनाअखेरपर्यंत मार्गी लावण्यात येईल. ग्रॅज्युइटी व प्रॉव्हिडंट फंडाचे हप्ते लवकर भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. हंगामी कामगारांच्या ग्रेडेशन प्रश्‍न मार्गी लावून त्यांना कायम करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे, अशी विनंती भोसले यांनी कामगारांना केली. भोसले यांनी दिलेल्या ठोस आश्‍वासनानंतर कारखाना सुरू झाला तरच आपले प्रश्‍न मार्गी लागतील. हे लक्षात घेऊन कामगार प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS