पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

अभिजित खंडागळे/पाथर्डी : थोर स्वातंत्र्य सेनानी पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार स्व. ना.ग. उर्फ बाबूजी आव्हाड यांचे जन्मशताब्दीवर्ष निमित्त पार्थ विद्

ओबीसी व मराठ्यांना आरक्षण द्या व भोंग्यातून अजान होऊ द्या
कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकऱ्याने संपवीली जीवनयात्रा
कोपरगाव तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याचा हत्या करणारे तीन आरोपी जेरबंद

अभिजित खंडागळे/पाथर्डी : थोर स्वातंत्र्य सेनानी पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार स्व. ना.ग. उर्फ बाबूजी आव्हाड यांचे जन्मशताब्दीवर्ष निमित्त पार्थ विद्या प्रसारक मंडळ आयोजित विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा नुकतीच संपन्न झाली. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रेरक संकल्पनेतून विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली या परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील २९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकून राहावा तसेच या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, एन. टी. एस. स्पर्धा परीक्षा या स्पर्धेची तयारी व्हावी या उद्देशाने प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. प्रज्ञाशोध परीक्षेचे स्वरूप व नियोजन इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रमाणे करण्यात आले असून इयत्ता पहिली व दुसरी साठी १५० गुणांची तसेच इयत्ता तिसरी व चौथी साठी दोन पेपर एकूण ३०० गुणांचे घेण्यात आले. प्रज्ञा शोध परीक्षेसाठी परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर गायके,अनुजा कुलकर्णी, जयश्री एकशिंगे, राधिका सरोदे,आशा बांदल, ज्योती हम्पे,कीर्ती दगडखैर, जयश्री खोर्दे,आरती दहिफळे यांनी कामकाज पाहिले. या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथी या प्रत्येक वर्गातून प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.

COMMENTS