कृषी पंपाच्या वीज तोडणीस स्थगिती ; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी पंपाच्या वीज तोडणीस स्थगिती ; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई : कृषीपंपाच्या वीज तोडणीस राज्यातील शेतकरी वर्गाने तीव्र संताप व्यक्त करत, आंदोलने करत वीजतोडणी मागे करत घेण्याची मागणी केली होती. अखेर मंगळवार

अजितदादा आणि आमच्यात मनभेद नाही
साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी तिपायले
सरकार पाडण्याचे उदात्तीकरण म्हणजे………! 

मुंबई : कृषीपंपाच्या वीज तोडणीस राज्यातील शेतकरी वर्गाने तीव्र संताप व्यक्त करत, आंदोलने करत वीजतोडणी मागे करत घेण्याची मागणी केली होती. अखेर मंगळवारी विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज तोडणीस तूर्तास स्थगिती देत असल्याची घोषणा केली.
विधीमंडळात मंगळवारी विरोधी पक्षांनी शेतकर्‍यांच्या वीज तोडणीचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीने शेतकर्‍यांची वीज कापतंय, असा आरोप करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच या प्रश्‍नी शेतकर्‍यांच्या बाजूने घोषणा झाली पाहिजे, असा आग्रह धरला. आज मंगळवारच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल करत शेतकरी कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला. या प्रश्‍वावरून विधानसभेत एकच गोंधळ सुरु झाला आणि सभागृहाचं कामकाज दुपारी एक वाजता स्थगित करावं लागलं. ज्या प्रकारे सावकार आणि सुल्तानी पद्धतीने हे सरकार वागते आहे, त्या विरोधात आम्ही एल्गार केला. सरकार जोपर्यंत यावर चर्चा करत नाही, तोपर्यंत हा मुद्दा आम्ही लावून धरू असं फडणवीस म्हणाले. शेतकर्‍यांच्या वीज तोडणीवरुन विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर विधीमंडळाचे कामकाज तूर्तास स्थगित झाले होते. पाच ते दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाले. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS