इस्लामपूर : शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी यांचा सन्मान करताना राजीव खांडेकर. समवेत संजय भोकरे, पै. चंद्रहार पाटील, प्रा. सौ. सुरय्या न
इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील राज्य शासनाचा पहिला शिव छत्रपती पुरस्कार मिळविलेले नजरुद्दीन नायकवडी यांना कुस्ती अध्यासन व संशोधन केंद्र, तसेच कुस्ती सम्राट युवराज पाटील वाचनालयाच्या वतीने ’महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देवून सन्मानीत करण्यात आले. तसेच त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळून 37 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या वतीने मानपत्र, सन्मानचिन्ह व चांदीची गदा त्यांना बहाल करण्यात आली.
सांगली जिल्ह्याचे सुपूत्र व संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खांडेकर म्हणाले, लाल माती, कुस्ती ही राज्याची खासियत आहे. अतिशय खडतर परिस्थितीशी सामना करत लाल मातीशी अखंड निष्ठा ठेवलेल्या राज्यातील मल्ल व प्रशिक्षकांमध्ये नायकवडी यांचे नांव घ्यावे लागेल.
यावेळी अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक संजय भोकरे, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, अभिनेते पै. संभाजीराव सावर्डेकर, प्रा. सुनीलदत्त पाटील, स्व. युवराज पाटील यांचे बंधू सरदार पाटील, श्री गणेश आखाड्याचे कोच पै. वसंतराव पाटील, राष्ट्रीय युवा फुटबॉलपटू सिध्दार्थ भोकरे, प्रा. पराग इनामदार, जुन्या काळातील महान मल्ल पै. साहेबलाल शेख, मुंबई पोलीस वाय. बी. पाटील, लेंगरेचे माजी सरपंच प्रशांत सावंत, वस्ताद संजय अवघडे, लेंगरेचे सरपंच हर्षल बागल, शकील शेख, रशीद शिकलगार, भरत पाटोळे, गणेश पाटील, प्रा. सौ. सुरय्या नायकवडी, रणजीत पाटील, अरविंद कदम, संजय पाटील, आर. जे. पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नायकवडी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू कुस्ती केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्ल घडविले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ना. जयंत पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, कुस्तीगीरांचे आश्रयदाते पंढरीनाथ पठारे, उद्योगपती महादेवराव पठारे, उद्योगपती भरतभाऊ अवताडे, नाना मोरे, अखिल भारतीय शैली कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक पै. डी. आर. जाधव, उद्योगपती तानाजीराव पाटील, ऑलम्पिक वीर पै. बंडा पाटील, उद्योगपती बापूसाहेब खुटवड, नर्सिंग कॉलेजचे प्रा. नकिब मुजावर, महान मल्ल माणिक जाधव, कुस्ती संघटक तुकाराम पाटील व संजय शिरसट यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS