Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे चोरीचा उलगडा; नातेवाईकाच्या बचावासाठी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची धडपड

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना काही तरुणांनी शुक्रवारी रात्री चार अल्पवयीन चोरट्यांना रंगेहाथ पकडले. लपवलेला चोरीचा

प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?
खंडाळ्याच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी दिन साजरा
वन विभागाच्या छाप्यात शिकार्‍यांची टोळी जेरबंद; सहा हातबॉम्बसह दोन दुचाक्या जप्त

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना काही तरुणांनी शुक्रवारी रात्री चार अल्पवयीन चोरट्यांना रंगेहाथ पकडले. लपवलेला चोरीचा माल बाहेर काढतानाचा फोटो व व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्या चौघा चोरट्यात एकजण शहरातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा नातेवाईक असल्याचे दिसून येत आहे. चोरट्याने चोरी केलेल्या कुटुंबातील एकाला दमदाटी करत मारहाण केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
याबाबत माहिती अशी, इस्लामपूर शहरातील वाघवाडी फाटा रस्त्यालगत एका अपार्टमेंटचे काम सुरू आहे. त्या कामावरील इलेक्ट्रिकल वायर शुक्रवारी रात्री चार अल्पवयीन मुलांनी चोरी केली. ही चोरी करताना काही तरुणांनी त्यांना रंगेहाथ सापडले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून संबंधित अपार्टमेंट मालकाला कल्पना दिली. अपार्टमेंट मालकाला आरोपींविरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले. यावेळी त्या चार चोरट्यांचे फोटो व व्हिडीओ काही तरुणांनी घेतले आहेत. चौघांनी चोरी केल्याची कबूली देत एकाने राष्ट्रवादीच्या त्या माजी नगरसेवकाचा नातेवाईक असल्याचे सांगितले. अल्पवयीन चोरटा व अपार्टमेंट मालक एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. चोरीच्या घटनेनंतर दुसर्‍या दिवशी अल्पवयीन चोरटयाने त्या अपार्टमेंटच्या मालकाला घरी जावून दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची माहिती पोलीस ठाण्यात समजली. त्यांनी या प्रकरणातील मारहाण झालेल्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. त्या कुटुंबियांकडून मारहाणीची तक्रार रविवारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाली नव्हती. रात्री उशिरापर्यंत संबंधित माजी नगरसेवक पोलीस ठाण्यात हेलपाटे घालत होता. अल्पवयीन चोरटे सापडले परंतू चोरी झालेल्या कुटुंबातील नागरिक तक्रार देत नसल्याने कारवाई काय करायची असा पेच पोलिसांना पडला आहे. तरीही चोरी व मारहाण प्रकरणाची चर्चा दबक्या आवाजात इस्लामपूर शहरात सुरू आहे.

COMMENTS