कुडाळ : संस्थापक सहकार पॅनेलच्या सांगता सभेवेळी बोलताना सैारभ शिंदे. सातारा / प्रतिनिधी : प्रतापगडचे सभासद नाहीत ते काय कारखान्याचा बचाव करणार, अश
सातारा / प्रतिनिधी : प्रतापगडचे सभासद नाहीत ते काय कारखान्याचा बचाव करणार, अशा अपप्रवृत्तींनी ही निवडणूक लादली आहे. संस्थापक सहकार पॅनेलकडे कारखाना सुरू करण्याबाबत ठोस कार्यक्रम असून विरोधक केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना स्वतःची संस्था वाचवता आली नाही. संस्थापक पॅनेलचे संचालक मंडळ पुढील गळीत हंगामात प्रतापगड कारखाना नक्कीच सुरू करेल, असा ठाम विश्वास पॅनेल प्रमुख व जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी सांगता सभेवेळी बोलताना व्यक्त केला.
कुडाळ येथे संस्थापक सहकार पॅनेलच्या कुडाळ येथे झालेल्या सांगता सभेवेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील सर्व नेते व सहकारी संस्थांचे पदाधिकारी गटतट, मतभेद विसरून उपस्थित झाले होते. सांगता सभेला सभासदांची विक्रमी गर्दी झाली होती.
सौरभ शिंदे पुढे म्हणाले, तालुक्यातील सर्व मान्यवरांनी आम्हांला पाठबळ दिले असून तालुक्यातील सर्व मान्यवरांनी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भूमिका घेतली, असे असताना मात्र विरोधकांनी जाणीवपूर्वक निवडणूक लादली आहे. सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडता संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिपक पवार यांच्यावर टीका करत प्रत्येक निवडणूक लढवायची त्यांचा धंदाच आहे. सगळ्यांनी एकत्र आल्यास कारखाना सुरू करणे शक्य आहे.
माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या सारख्या कर्तृत्ववान व स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला आदरांजली म्हणून कारखान्याच्या या निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी आपले मत देऊन विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी उपसभापती रविंद्र परामणे, बुवासाहेब पिसाळ यांनी मनोगते व्यक्त केली. अॅड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले.
COMMENTS