वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल कृष्णा कारखान्याकडून अदा

Homeमहाराष्ट्रसातारा

वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल कृष्णा कारखान्याकडून अदा

उंडाळे विभागातील अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

पुण्यात 1100 कोटींचे ड्रग्ज जप्त
पुणे विद्यापीठात वर्गणी न दिल्याने राडा
jalgaon:भुसावळ तालूक्यातील फुलगांव येथे पाणी प्रश्न पेटला | LOKNews24

4 लाख 29 हजार 732 रूपयांचा चेक वाकुर्डे योजनेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द

कराड / प्रतिनिधी : उंडाळे विभागातील अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम अनेक काळ थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी कृष्णा कारखान्याने पुढाकार घेत, थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उर्वरित थकीत वीजबिलापोटी 4 लाख 29 हजार 732 रूपयांचा चेक आज पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आला. या थकीत वीजबिलापोटी कृष्णा कारखान्याने आजअखेर 15 लाख 80 हजार 554 रूपये भरत, या भागातील शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे.

कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीज बिल थकीत असल्याने सन 2018 मध्ये या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. वीज बिलाची थकीत रक्कम जास्त असल्याने शेतकर्यांना ही रक्कम भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत योग्य तोडगा काढावा, अशी मागणी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर करून, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला होता.

दरम्यान, शेतकर्‍यांचे हीत लक्षात घेऊन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने या भागातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 8 लाख 19 हजार रूपये, तसेच दुसर्‍या टप्पात 3 लाख 31 हजार 922 रूपये भरले होते. यापैकी उर्वरित 4 लाख 29 हजार 732 रूपयांचा चेक आज पेठ नाका,ता. वाळवा येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील, बंटी जाधव, सेक्रेटरी मुकेश पवार, हंबीरराव पाटील, पंकज पाटील आदी उपस्थित होते.

COMMENTS