फलटण / प्रतिनिधी : पुण्यातील एका व्यापार्याची जिंती नाका फलटण येथे गाडीची काच फोडून पाच लाख तीस हजाराची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून
फलटण / प्रतिनिधी : पुण्यातील एका व्यापार्याची जिंती नाका फलटण येथे गाडीची काच फोडून पाच लाख तीस हजाराची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अर्मितलाल वर्दीचंद ओसवाल (वय 51 वर्षे व्यवसाय हार्डवेअर रा. बी/11, श्रीकृष्ण सोसायटी, शंकरशेठ रोड पुणे) यांचे स्वत:चे भवानी पेठ पूणे येथे स्वाती हार्डवेअर सप्लायर दुकान आहे. ओसवाल हे हार्डवेअर दुकानामध्ये इतर किरकोळ हार्डवेअर विक्री करण्यार्या दुकानदारांना मालाचा पुरवठा करतात. दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भवानी पेठ पूणे येथून किरकोळ विक्री दुकानदाराकडे पेमेंट घेणेसाठी ग्रे रंगाची टोयोटा अल्टीसमधून सोमेश्वर निरा लोणंदहुन फलटणमध्ये हार्डवेअरच्या किरकोळ दुकानाकडून पेमेंट घेत आले होते. यावेळी गोळा केलेली रोख रक्कम त्यांच्याकडील काळ्या रंगाची हँण्ड बँगमध्ये ठेवली होती.
फलटणमधील काही दुकानदारांकडून रोख रक्कम घेऊन यानंतर जेवण करून 4 वाजण्याच्या सुमारास जिंती नाका येथील एसआर जांगीड अॅण्ड ग्लास फलटण दुकानासमोर कार लावत ओसवाल पेमेंट घेण्यासाठी गेले. ओसवाल यांनी कारमध्ये ड्रायव्हर शीटच्या बाजूला शीटवर कॅश ठेवलेली काळी बॅग ठेवली होती. थोड्या वेळात ओसवाल यांना दुकानातील कामगाराने तुमच्या कारची काच फुटली असल्याचे सांगितले. लगेचच ओसवाल यांनी कारजवळ जावून पाहिले असता कारची समोरील ड्रायव्हरच्या शेजारील बाजूची काच फुटलेली दिसली. तसेच शीटवरील रोख रक्कम ठेवलेली काळी बॅग गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
गाडीतील बॅगमध्ये 5 लाख 30 हजार रूपये होते ती बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची बाब लक्षात आल्यानंतर याप्रकरणी ओसवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
COMMENTS