काँग्रेस व राष्ट्रवादीची निवडणूक तयारी सुरू…सेना-भाजप थंडच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस व राष्ट्रवादीची निवडणूक तयारी सुरू…सेना-भाजप थंडच

अहमदनगर/प्रतिनिधी : आगामी नऊ नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी या द

विडी कामगारांना मिळाली घर बांधण्यासाठी हक्काची जागा
छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन
श्रीनागेश्‍वर पालखी सोहळा जामखेडला उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : आगामी नऊ नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांनी नगर जिल्ह्यात सुरू केली आहे. आघाडी सरकारमधील त्यांचा तिसरा सहकारी पक्ष असलेला शिवसेना आणि या तीन पक्षांच्या आघाडीविरोेधात असलेल्या भाजपच्या गोटात मात्र अजूनही थंड वातावरण आहे. दरम्यान, काँग्रेसने उद्या सोमवारी (28 फेब्रुवारी) शिर्डीत व राष्ट्रवादीने परवा मंगळवारी (1 मार्च) नगरमध्ये आगामी निवडणुकांच्यादृष्टीने आढावा बैठकांचे नियोजन केले आहे.
जिल्हा परिषदेच्या 85 व पंचायत समित्यांच्या 170 जागांसह नऊ नगरपालिकांच्या मिळून सुमारे दोनशेवर जागांसाठी येत्या दोन-तीन महिन्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही काँग्रेसने आवश्यक तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची माहिती घेण्यासह संघटनात्मक रचना व अन्य राजकीय पक्षांच्या हालचाली यांची माहिती घेतली जात आहे तसेच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीचीही तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिर्डीत सोमवारी उत्तर महाराष्ट्राच्या काँग्रेस पदाधिकार्‍यांचा मेळावा सकाळी 11वाजता साई सृष्टी मंगल कार्यालय येथे होणार असून, यावेळी पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील, पल्लम राजू, ना. बाळासाहेब थोरात, के.सी.पाडवी उपस्थित राहणार आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या मेळाव्याचे नियोजन केले आहे. नगर, नाशिक, धुळे, जळगाव,नंदुरबार येथील पदाधिकार्‍यांना तसेच जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचा मंगळवारी मेळावा
जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने मंगळवारी (दि. 1 मार्च) दुपारी 12.30 वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्रीताई घुले आणि पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पुणे रोडवरील राष्ट्रवादी भवनात होणार आहे. जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, माजी आमदार व प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

COMMENTS