Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुड फ्रायडेनिमित्त येशूंच्या मानवतावादी विचारांचे स्मरण : अजित पवार

गुड फ्रायडेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येशू ख्रिस्ताच्या दया, क्षमा, शांती, प्रेम, त्यागाच्या संदेशाचं व सेवाकार्याचं स्मरण केलं असून येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी, असं आवाहन केले आहे.

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे होणार… जमिनीसाठी शेतकर्‍यांना नोटिसा
अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
आजचे राशीचक्र रविवार, ०७ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा (Video)

मुंबई :- गुड फ्रायडेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येशू ख्रिस्ताच्या दया, क्षमा, शांती, प्रेम, त्यागाच्या संदेशाचं व सेवाकार्याचं स्मरण केलं असून येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी, असं आवाहन केले आहे. 

गुड फ्रायडेच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,  येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचं, मानवसेवेच्या कार्याचं स्मरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी येशूंनी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचं कल्याण करत राहतील. कोरोनामुळे जग संकटात असताना येशूंचा मानवसेवेचा, विश्वकल्याणाचा संदेशच जगाला वाचवणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

COMMENTS