Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालयाकडून गावोगावी प्रसिध्दी

सातारा / प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमा

दुचाकी-चारचाकी कारची समोरासमोर धडक; एकजण जागीच ठार
शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा पुरविण्याची शिक्षक परिषदेची मागणी
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा केंद्र सरकारचा निषेध मोर्चा

सातारा / प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करीत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मोबाईल फिरत्या वाहनावरुन एलईडी व्हॅनच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडील विविध योजनांची प्रसिध्दी सुरु आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिध्दी एलईडी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, सैनिकी शाळेतील अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, अत्याचारास बळी पडलेल्या कुटुंबांना अर्थसहाय्य, आयटीआय विद्यार्थ्यांना विद्यावेतन, विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती, रमाई आवास योजना, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मुला-मुलींकरिता शासकीय वसतिगृह, निर्वाह भत्ता व विद्यावेतन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना यासह सामाजिक न्याय विभागाकडील अनेक योजनांची एलईडी व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमधून प्रसिध्दी करण्यात येत आहे. नागरिकांनी या योजनांची माहिती करुन घ्यावी.

COMMENTS