राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर समाजामध्ये प्रबोधन करण्याचे असामान्य काम करून त्यांनी सामाजिक बदलाचा संदेश दिला आहे. आज त्यांची जयंती सर्वत्र सा
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर समाजामध्ये प्रबोधन करण्याचे असामान्य काम करून त्यांनी सामाजिक बदलाचा संदेश दिला आहे. आज त्यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. पण त्यांच्या विचाराप्रमाणे आज समाजव्यवस्तेत फारसे कुणी काम करताना दिसत नाही. गाडगे बाबा यांनी समाजात फिरून आणि कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी प्रबोधन केलेले आहे. आजचे बाबा, बुवा, महाराज यांचे वर्तन हे गाडगे बाबा यांच्या विचाराशी ताळमेळ न जुळणारे आहे. आजचे महाराज पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करत नाहीत. गाडगे बाबा तसे करत नव्हते. त्यामुळे आजच्या सर्व बाबा, बुवा, महाराज यांनी गाडगेबाबा यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
सॅन गाडगे बाबा यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्यासाठी त्यांनी पै फिरून प्रचंड मेहनत घेतली आहे. आजचे महाराज आपण पहिले तर ते आलिशान गाड्यात फिरताना आपल्याला दिसतात. गाडगे बाबा यांच्या डोक्यात जसे विचार होते तसे आजच्या महाराजांच्या डोक्यात विचार दिसत नाहीत. गाडगे बाबा यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला प्रचंड लोक जमा व्हायचे. आजच्या महाराजांचे कीर्तन आपण पहिले तर त्यात विचार आपल्याला दिसत नाहीत. गाडगे बाबा यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. त्यामुळे ते खरे प्रबोधन करणारे महाराज म्हणून सर्वमान्य आहेत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. हि वर्हाडी भाषा सर्वाना समजणारी आणी ऐकायला चांगली असल्यामुळे लोक आवडीने गाडगे बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी जात असत आणि बाबानी दिलेल्या उपदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.
गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र कार्यक्रम होताना आपण पाहत असतो. पण गाडगे बाबा यांच्या विचाराप्रमाणे आज सर्वानी चालण्याची गरज आहे. विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा. असे गाडगे बाबा नेहमी सांगत असत. गरीबाच्या मुलाला कपडे द्या. टोपी द्या. पाटी द्या. कोरी वही द्या. आपल्या पोराला विलायतेला पाठवायची इच्छा करता अन् गरिबांच्या मुलाला एक-दोन आण्याची वही देण्याची आपल्यात बुद्धी नाही तर आपण माणसं नाही. दिवाळीला टोपलं भर लाडू केले. घरच्या पोराला खूप खाऊ घाला. पण दोन पोरं गरिबाचे येऊन उभे राहिले, तर त्यांना दोन लहान, दोघाला दोन लाडू द्या. अश्या उपदेशातु ते सामाजिक घडी बसवण्याचे काम करत असत. त्यामुळे ते खरे किर्तनकार होते. त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारणा समजून घ्यावे हि अपेक्षा.
COMMENTS