अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी वांगदरी रोडवर (लहारेपट) येथे राहणारे माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते (वय 48) यांच्या घराचा शुक्रवा
अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी वांगदरी रोडवर (लहारेपट) येथे राहणारे माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते (वय 48) यांच्या घराचा शुक्रवारी भरदुपारी दरवाजा तोडून चोरट्यांनी घराच्या कपाटातील सुमारे पंधरा तोळे सोने व पिस्तूल चोरुन नेले. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी( लहारेपट) येथील सेवानिवृत्त माजी सैनिक जालिंदर पाचपुते हे गावचा आठवडे बाजार व शिवजयंती असल्यामुळे गावात बाजारला आले होते. तर घरातील महिला शेतातील काम करण्यासाठी शेतावर गेल्या असताना दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्याने घराचे दरवाजे व कुलपे कटावणीने तोडून कपाटातील पंधरा तोळे सोने व निवृत्तीनंतर पाचपुते यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी घेतलेले पिस्तुल चोरून नेल्याने गावात खळबळ उडाली. या घटनेनंतर जालिंदर यांचे बंधू ग्रामपंचायत सदस्य मेजर चांगदेव पाचपुते यांनी पोलिसांना खबर दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी फौजफाट्यासह धाव घेऊन घटनेची पाहणी व पंचनामा करुन तपासाची चक्रे फिरवत खबर्यांमार्फत तपास सुरु केला आहे. अधिकचा तपास करण्यासाठी नगर येथून श्वानपथक बोलावून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु काष्टी वांगदरी रस्त्याच्या कडेला हे घर असल्याने व रस्त्यावर जास्त वाहतूक असल्याने श्वानाला पुढे माग दाखवता आला नाही. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
COMMENTS