महाडिक मल्टिस्टेटला 39 लाखाचा नफा : राहुल महाडिक

Homeमहाराष्ट्र

महाडिक मल्टिस्टेटला 39 लाखाचा नफा : राहुल महाडिक

वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को आप क्रेडिट सोसायटी लि.

केएसके कॉलेजच्या शिक्षकाला तात्काळ बरखास्त करा-नुमान चाऊस
लातूर मंडळात पुरवणी परीक्षेत दहावीचा 51 तर बारावीचा 58 टक्के निकाल
महायुतीत निवडणुकीआधीच मिठाचा खडा

इस्लामपूर / प्रतिनिधी : वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को आप क्रेडिट सोसायटी लि., इस्लामपूर या सोसायटीला 31 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेस 39 लाख 6 हजार 322 नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक  राहुल महाडिक यांनी दिली. 

राहुल महाडिक म्हणाले, श्री नानासाहेब यांच्या नावे सुरु केलेल्या संस्थेस स्थापनेपासुन सतत आडीट वर्ग अ मिळाला असून संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग व सभासद, ठेवीदारांच्या विश्‍वासावर चाललेली एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जात आहे.

आर्थिक वर्षामध्ये संस्थेचे अधिकृत भागभांडवल 10 कोटी असूनही वसुल भागभांडवल 5 कोटी 46 लाख इतके आहे. संस्थेची एकुण गुंतवणूक 23 कोटी 40 लाख एवढी आहे. चालु वर्षात सभासद ठेवीदार यांनी विश्‍वास दाखवून कोविड 19 च्या काळात ठेवीमध्ये भरघोस वाढ झाली आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 60 कोटी 40 लाख इतकी आहे. तसेच कोविड 19 मध्ये कर्जदारांनी स्वतःची संस्थेमध्ये असणारी पत कायम रहावी यासाठी कर्जाची रक्कम भरून संस्थेस सहकार्य केले.  

संस्थेचे एकूण कर्ज वाटप 39 कोटी 63 लाख एवढे झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक ठेव योजना, जीवन समृध्दी ठेव, शुभ विवाह ठेव, मासिक पेन्शन ठेव, वनश्री लखपती ठेव योजना अशा अनेक प्रकारच्या ठेव योजना व कर्ज योजना असल्याचे सतीश महाडिक यांनी सांगितले. 

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र आडमुठे, संचालक प्रा. प्रदिप पाटील, कपिल ओसवाल, सुशिल सावंत, नागेश पाटील, सागर कोरोचे, राजू मुंडे, तसेच सर्व शाखांचे शाखाधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापक आर. एम. बागडी यांनी केले व आभार शाखा व्यवस्थापक अमोल पाटील यांनी मानले.

COMMENTS