कोपरगाव शहर प्रतिनिधी- दि १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरोघरी साजरी होणार असून कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
कोपरगाव शहर प्रतिनिधी- दि १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरोघरी साजरी होणार असून कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती आहे त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते त्या बाबत विविध मंडळे, पक्ष संघटना यांच्या कडून मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मात्र मागील वर्षी साथीच्या आजाराने समाज बांधवांच्या आनंदावर विरजण पडले होते या वर्षी देखील साथीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून जयंतीच्या कार्यक्रमाबाबत नागरिकां मध्ये द्विधा मनस्थिती आहे अनेक ठिकाणी जयंती साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे मागील काही दिवसात विविध महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाने मार्गदर्शक सूचना व नियमावली आखून दिली होती त्यामुळे हे कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडले होते
मात्र सद्या पुन्हा साथीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे रोजच्या रोज उच्चांकी पेशंट निघत आहे त्यामुळे ऐन वेळी आंबेडकर प्रेमी नागरिकांचा हिरमोड होऊ नये यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने या बाबत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करून त्यात विविध पक्ष संघटना व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या सोबत विचार विनिमय करून या बाबत जनभावना जाणून घ्यावी तसेच या जयंती संदर्भात प्रशासनाने जयंतीच्या पूर्व परवानगी, त्या बाबतच्या नियम व अटी यांच्या बाबत चर्चा करावी म्हणजे ऐन वेळी आंबेडकर प्रेमी नागरिकांचा हिरमोड होणार नाही तसेच साथीच्या आजाराला पायबंद घालण्यासाठी काय काळजी घेता येईल याची चर्चा करता येईल तरी लवकरात लवकर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे असे या पत्रकात म्हटले असुन या पत्रकावर लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के, किरण अढांगळे, गोपीनाथ ताते, दत्तू खैरनार,पप्पू वीर सुजल चंदनशिव, बाळू पवार,घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे, नितीन बनसोडे, कोपरगाव व्यापारी समितीचे अकबर शेख,निसार शेख आदींनी केले आहे
COMMENTS