अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यादेश

अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेसंदर्भातील मोठा गोंधळ समोर

लोहा शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग बनला चिखलमय पांदण रस्ताखड्ड्यामुळे नागरिक त्रस्त
कोयता गँगच्या म्होरक्याला पोलिसांनी ठोकल्या बेडया
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेसंदर्भातील मोठा गोंधळ समोर आला. बुधवारी सकाळी एक अज्ञात व्यक्तीने कारसहीत अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखल्याने आणि मोठा अनर्थ टळला. या व्यवक्तीला सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा इसम आपल्या शरीरामध्ये चीप असल्याचे सांगत होता. मला कंट्रोल केले जात असल्याचा दावा या व्यक्तीकडून केला जात होता. मात्र तपासामध्ये या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणतीही चीप आढळून आली नाही. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही कर्नाटकमधील बंगळुरुची आहे. दिल्ली पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाबरोबरच विशेष पथकाककडून आता या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. भारताचे जेम्स बॉण्ड नावाने अजित डोवाल यांना ओळखलं जातं. ते पाकिस्तान आणि चीनविरोधात भारताचे सुरक्षा धोरण ठरवणार्‍या महत्वाच्या अधिकार्‍यांपैकी एक आहेत. डोवाल यांना अनेक दहशतवादी संघटनांपासून धोका आहे. मागील वर्षी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी डोवाल यांच्या कार्यालयाची पहाणी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

COMMENTS