फडणवीसांच्या काळात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार ; शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांच्या काळात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार ; शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मुंबई/प्रतिनिधी :अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे राज्यात छापे पडत असून, राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेना नेत्यांना, त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिल

चिमूर तालुक्यात अंगणवाडी बाहेर जादूटोण्याचा प्रकार (Video)
Akole : राजूर येथे आगळे वेगळे गणेश विसर्जन
नॅशनल इन्स्टिट्यूट हा परसोनेल मॅनेजमेंट राष्ट्रीय निवडणूक अधिकारी” म्हणून  नाशिकचे एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांची निवड

मुंबई/प्रतिनिधी :अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे राज्यात छापे पडत असून, राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेना नेत्यांना, त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात आहे. मात्र आम्ही काही गुन्हा केलाच नाही, तर घाबरायचे कशाला. याउलट महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाला. हा घोटाळा तब्बल 25000 कोटी रुपयांचा होता, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
यावेळी माध्यमांना संबोधित करतांना राऊत म्हणाले की, फडणवीसांच्या काळात खूप घोटाळे झाले, पण त्यातला सर्वात मोठा घोटाळा महाआयटीत झाला. या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? त्यांना कुठे लपवले ते त्यांनी सांगावे. महाआयटीतल्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे, सर्वांचे अकाऊंट्स, त्यांच्या लिंक्स, त्यांचे मनी ट्रान्झॅक्शन्स, विना टेंडर कोणाकोणाला कंत्राटे दिली? कोणाला किती रुपये दिले? याची माहिती येत्या दोन दिवसात इओडब्लू आणि ईडीकडे दिली जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले, मुळात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपीने सोमय्याच्या जवळच्या माणसाला जमीन का विकली, असा सवाल करत, हा भ्रष्टाचाराशी लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय. आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजने करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले. राऊत म्हणाले, दुसरी गंमत तुम्हाला सांगतो. पीएमसची तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो. ईडी भ्रष्ट आहे. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत. हा माझा दावाय. ईडीची हिंमत असेल, तर त्यांनी माझ्या घरी यावे. मी नागडा माणूस आहे. कितीही दाबण्याचा प्रयत्न करा. आय विल फाईट, असा इशारा त्यांनी दिला. शिवाय जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे मला ईडीने सांगावे असे आव्हान दिले.

सरकारमधून बाहेर पडण्यासाठी भाजप नेत्यांच्या धमक्या
सरकार पाडण्यासाठी भाजप उतावीळ झाली आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि पश्‍चिम बंगालमध्ये त्यांना सत्ताबदल करायचा आहे. त्यासाठी भाजपचे काही प्रमुख लोकं मला तीनदा दिल्लीत भेटले. वारंवार मला हेच सांगितले की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचं. आमची सगळी तयारी झालेय. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटले हे कसे शक्य आहे? त्यानंतर त्यांनी ईडीच्या माध्यमातून आम्हाला धमकावण्यास सुरूवात केल्याचा आरोप राऊत यांनी केला.

मुंबईतल्या 70 बिल्डरकडून ईडीच्या एजंटकडून वसुली
ईडीची हिंमत असेल तर त्यांनी माझ्या घरी यावे, मी नागडा माणूस आहे. कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी संघर्ष करेन. जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे ईडीने मला सांगावे. हे नाव ऐकून ईडीच्या मुंबई, दिल्ली ऑफिसला घाम फुटला असेल. चार महिन्यांपासून मुंबईतल्या बिल्डरांकडून वसुली सुरू आहे. मुंबईतल्या 70 बिल्डरांकडून वसुली केली आहे. हे सारे मी मोदींनी आणि अमित शहांना लिहिणार आहे. या फळीत शमा, रोमी ही लोक कोण आहेत, असा सवाल ही त्यांनी केला.

COMMENTS