राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नगरचा डंका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नगरचा डंका

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सथ्था फार्मसी कॉलेजचा राज्यात दुसरा क्रमांक येऊन या संघाने उपविजेतेपद मिळवले. या विद्यार्थ्यांचे मह

नगरच्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले
सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम
धनुष्यबाण चिन्हावर आगामी सर्व निवडणुका लढवणार ः खा.सदाशिव लोखंडे

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सथ्था फार्मसी कॉलेजचा राज्यात दुसरा क्रमांक येऊन या संघाने उपविजेतेपद मिळवले. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने कौतुक करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व युवा समूह 2021-22 निमित्ताने आयोजित क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य(पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (नाशिक) व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (झाडी) संचलित गोरक्षनाथ स्कूल (धोंडवे) यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्ृतत्व स्पर्धेत पंधरा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उत्कृष्ट सादरीकरण केले. या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेमध्ये नगरच्या एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर या महाविद्यालयाच्या पदविका शाखेतील विद्यार्थिनी वैष्णवी अतुल कराळे हिने द्वितीय व श्रुतिका धनंजय दळवी हिने तृतीय पारितोषिक मिळवले तसेच उत्तेजनार्थ बक्षीस किरण राजेंद्र डमाळे या विद्यार्थ्याला मिळाले. त्यामुळे सांघिक स्तरावर सत्ता महाविद्यालयाला उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश साळुंखे व संचालक शेवाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख विकास गवळी व गौरव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्यावेळी गणेश कर्डिले, सुवर्णा कोठूळे, कल्याणी लांडगे, कोमल दांगट आदी उपस्थित होते. कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अ‍ॅड शिवाजीराव काकडे, जि.प. सदस्य हर्षदाताई काकडे, शैक्षणिक समूह मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य डॉ. विशाल पांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS