Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट

कराचा बोजातून वीज दरवाढ होत असल्याने सूट; शेवटच्या घटकापर्यंत वीज पोहोचविण्याचे महावितरणचे कार्यसातारा / प्रतिनिधी : स्थानिक पातळीवर कर आकारणी केल्या

पन्हाळ्यावर सापडला आणखी एक तोफगोळा
आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी
फास्ट टॅग स्कॅन होण्यास अडचण; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनचालकास मारहाण

कराचा बोजातून वीज दरवाढ होत असल्याने सूट; शेवटच्या घटकापर्यंत वीज पोहोचविण्याचे महावितरणचे कार्य
सातारा / प्रतिनिधी : स्थानिक पातळीवर कर आकारणी केल्यास त्याचा फटका सरतेशेवटी वीज ग्राहकांनाच दरवाढीच्या रुपाने बसत असल्याने महाराष्ट्र शासनाने महावितरणसह विजेची निर्मिती, पारेषण करणार्‍या शासकीय कंपन्यांना कर आकारणीतून वगळलेले आहे. ही वस्तुस्थिती असताना काही नगरपालिका व ग्रामपंचायती महावितरणला कर आकारणी करुन महावितरणच देणे लागत असल्याचा बनाव करुन नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.
20 डिसेंबर 2018 रोजी 201812211507380610 या क्रमांकाच्या शासन आदेशानुसार ‘महावितरण या शासकीय वीज कंपनीकडून राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत वीज पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. त्यासाठी कंपनीकडून ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या हद्दीत उपरी वाहिन्या, भूमिगत वाहिन्या, वितरण रोहित्रे, विजेचे खांब व पारेषणचे मनोरे उभारले जातात. यासर्वांवर जर स्थानिक पातळीवर कर आकारणी झाल्यास त्या करांचा बोजा कंपनीच्या वार्षिक महसूलात समाविष्ट होऊन त्याचा समावेश वीज दरात होऊन वीज दरवाढ होते. त्यामुळे अशी कोणतीही कर आकारणी करण्यात येऊ नये,’ असे म्हटले आहे. तसेच संबंधित विभागांना अधिनियम बनविण्याचे तर ग्रामविकास व नगरविकास विभागालाही सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशित केलेले आहे.

COMMENTS