Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिवदान देणार्‍या दूताचा हृदय विकाराने मृत्यू; कावडी गावच्या माजी सरपंचाबाबतची हृदयद्रावक घटना

पाचगणी / वार्ताहर : गाडीचे स्टेरिंग दुसर्‍याचा जीव वाचविण्याकरिता जीप घेऊन गेलेल्या कावडी गावचे माजी सरपंच नामदेव गेनू मानकुमरे (वय 65) यांचाच हृ

अजित दादांचे घड्याळ आता निशिकांत दादांच्या हाती ?
दुचाकी-ट्रक धडकेत युवक जागीच ठार; एक जखमी
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात

पाचगणी / वार्ताहर : गाडीचे स्टेरिंग दुसर्‍याचा जीव वाचविण्याकरिता जीप घेऊन गेलेल्या कावडी गावचे माजी सरपंच नामदेव गेनू मानकुमरे (वय 65) यांचाच हृदय विकाराच्या धक्क्याने जिवदान देणार्‍या दूताने अखेरचा श्‍वास घेतला. या घटनेने मानकुमरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की आज सकाळी कावडी, ता. जावळी येथील जीपमालक नामदेव गेनू मानकुमरे हे आपल्या नात्यातील आखेगणी, ता. जावळी येथील वयोवृध्दास उपचारासाठी सातारा येथे घेऊन आले होते. सातारा येथे पोचल्यानंतर त्यांना स्वतःला तीव्र हृदय विकाराचा धक्का बसला. याप्रसंगी उपस्थित नातलगांनी त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या जाण्याने मानकुमरे कटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. ते कावडी गावचे माजी सरपंच होते. नातेवाईकास सातारा येथील रुग्णालयात घेवून आले खरे. मात्र, नियतिने अशा व्यक्तीला हृदय विकाराच्या धक्क्याने आपल्यापासून हिरावून नेले. या घटनेने कावडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. गरजू व्यक्तीला जिवदान देण्यासाठी योगदान देणार्‍यालाच आता त्यांची स्वत:ची गाडी दुसर्‍याच्या मदतीने नेण्याची वेळ आल्याने नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली.

COMMENTS