बसच्या सीटखाली ठेवलेला दागिन्यांचा डबा लांबवला

Homeताज्या बातम्या

बसच्या सीटखाली ठेवलेला दागिन्यांचा डबा लांबवला

अहमदनगर/प्रतिनिधी-राहुरी येथून नगर शहराकडे एसटी बसने प्रवास करत असताना बसमध्ये दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात तोफखाना पोलिस

माधुरी तिय्या यांना प्रहार जीवनगौरव व प्रहाररत्न पुरस्कार
संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून पशू पक्षांसाठी अन्न-पाण्याची सोय 
संगमनेर नगरपरिषदेचे काम राज्यासाठी आदर्शवत ठरेल

अहमदनगर/प्रतिनिधी-राहुरी येथून नगर शहराकडे एसटी बसने प्रवास करत असताना बसमध्ये दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती भास्कर लांडे (वय 21, रा. पाईपलाईन रोड, अ.नगर) या बहिणीच्या लग्नासाठी नगर शहरातून राहुरी येथे गेल्या होत्या. लग्नानंतर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास त्या त्यांच्या जावेसोबत नगरकडे एसटी बसने येत होत्या. लांडे यांनी त्यांचे दागिने एका डब्यात ठेवून तो डबा पिशवीत एसटी बसच्या सीटखाली ठेवला होता. सावेडी नाका येथे उतरत असताना त्यांना डबा मिळून आला नाही. लांडे यांच्या शेजारील सीटवर तीन अनोळखी महिला बसल्या होत्या. बसमधून त्या महिला एमआयडीसी येथील सह्याद्री चौकात उतरल्या होत्या. त्याच महिलांनी दागिने चोरले असल्याचा संशय लांडे यांनी व्यक्त केला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत.

COMMENTS