अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी 28 जणांची निर्दोष मुक्तता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी 28 जणांची निर्दोष मुक्तता

गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील 77 आरोपींपैकी 28 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. याप्रकरणी 3 सप्टें

लोकशाहीसाठी मतदान करण्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे ढाकणवाडी गावाला आवाहन..
मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा
सरकार कधी बदलायचे, ते माझ्यावर सोडा : फडणवीस

गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील 77 आरोपींपैकी 28 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. याप्रकरणी 3 सप्टेंबर 2021 रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. परंतु, विशेष न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008 रोजी 70 मिनीटात 21 बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे 200 लोक जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणल्याचा दावा पोलिसांनी केला होता. राज्यात 2002 मध्ये गोध्रा नंतरच्या दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिदीननं हे स्फोट घडवून आणले होते. अहमदाबादमधील बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी पोलिसांनी सुरतमध्ये विविध ठिकाणांहून बॉम्ब जप्त केले होते. यानंतर अहमदाबादमध्ये 20 आणि सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले होते. डिसेंबर 2009 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रदीर्घ सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने 1100 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष न्यायाधीश एआर पटेल यांनी गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी संपल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.

COMMENTS