जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामाधील काकापोरा भागात सुरक्षा दलांच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामाधील काकापोरा भागात सुरक्षा दलांच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये जवळपास सहा तास ही चकमक सुरू होती. आधी एक दहशतवादी ठार झाल्याची माहित होती; पण यानंतर जवानांनी आणखी दोघांना घेरले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या घराला आयईडीने उडवून दिले.
चकमकीवेळी काही स्थानिकांनी सुरक्षा दलाच्या जवानांना विरोध केला. त्यांना नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांना कारवाई करावी लागली. यात दोन नागरिक जखमी झाले. पुलवामातील काकापोराधल्या समबोरा गावात दहशतवादी लपून असल्याची माहिती शक्रवारी सकाळी सुरक्षा दलांना मिळाली. यानंतर सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराच्या उत्तरात सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई केली. ठार झालेले दहशतवादी हे लश्कर- ए- तोयबा आणि अल-बदरचे होते, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिली.
COMMENTS