Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकी-ट्रक धडकेत युवक जागीच ठार; एक जखमी

दहिवडी / प्रतिनिधी : शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बु। (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी, ता. माण ये

अंत्री येथील स्वामी समर्थांना सव्वा किलो चांदीचा मुकुट अर्पण
दहशदवादाचे मुंबई कनेकशन
साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला काटा; दोघांवर गुन्हा दाखल

दहिवडी / प्रतिनिधी : शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बु। (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी, ता. माण येथे भीषण अपघात होऊन सूर्यकांत लाला जाधव (वय 30) हा जागीच ठार झाला. तसेच एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरवळ एमआयडीसीत कामाला असलेले सूर्यकांत जाधव व महेश कट्टे हे दुचाकीवरून निघाले होते. पांगरीजवळ आल्यानंतर बिरोबा मंदिरानजिक रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला फलटणहून येत असलेल्या ट्रकची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी फुटबॉलसारखी शंभर फुटापर्यंत ट्रकने फरपटत नेली. यामध्ये सूर्यकांत जागीच ठार झाला. अपघातात महेश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरुन पळून गेला.
अपघाताची माहिती समजताच दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जाधव यांना मृत घोषित केले. तर कट्टे याच्या प्रथमोपचार करून उपचारासाठी सातारा येथे पाठविण्यात आले आहे. घटनेचा तपास सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस करत आहेत. सूर्यकांत जाधव यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS