फलटण / प्रतिनिधी : निभोरे ते मिरगांव रस्त्यावर अवैध वाळू वाहतुक करताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन 10 लाख रुपयांच्या किंमतीचा म
फलटण / प्रतिनिधी : निभोरे ते मिरगांव रस्त्यावर अवैध वाळू वाहतुक करताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन 10 लाख रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विधीसंघर्ष बालकासह 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत निभोरे ते मिरगांव जाणारे रोडने पांढरे – पिवळे रंगाचे डंपरमधुन वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतुक करणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास मिळाली होती. दि. 2 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास निभोरे ते मिरगांव जाणारे पालखी विसाव्याजवळील रोडवर पथकाने सापळा रचुन वाहतूक करणार्या वाहनांवर छापा टाकला असता एक टाटा कंपनीचा 1613 मॉडेलचा डंपर व अल्टो कारचा वापर करुन एका विधीसंघर्ष बालकासह 2 व्यक्ती डंपरमध्ये वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतुक करताना मिळून आले.
त्यावेळी 3 ब्रास वाळूने भरलेल्या डंपर व एका अल्टो कारसह ताब्यात घेतले. प्रशांत सतीश भिसे (वय 19) व महेश उर्फ अक्षय विलास गायकवाड (वय 26, दोघे रा. सुरवडी, ता. फलटण) यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका विधीसंघर्ष बालकासह 2 व्यक्तींना ताब्यात घेवुन एक टाटा कंपनीचा 3 ब्रास वाळूने भरलेला डंपर व अल्टो 800 कार असा एकुण 10 लाख 36 हजार रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्हाडे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा किशोर धुमाळ यांचे आदेशानुसार सहाय्यक फौजदार दबडे, पोहवा विश्वनाथ संकपाळ, राजकुमार ननवरे, संतोष पवार, पोना. अमोल माने, अर्जुन शिरतोडे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनिर मुल्ला, पोशि. प्रविण पवार, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
COMMENTS