Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा तालुक्यातील निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबरास जीवदान

सातारा / प्रतिनिधी : निगडी, ता. सातारा येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासाच्या प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला

वारणा डाव्या कालव्यासाठी गेलेल्या जमिनीचा बागायतीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा लगतच्या भेंडवडे इनमदारवाडी येथे वृक्षतोड
कांदा चाळ उभारण्यासाठी मिळणार अनुदान

सातारा / प्रतिनिधी : निगडी, ता. सातारा येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासाच्या प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान, पायामध्ये शिकारीचा फासा लागल्याने जखमी होऊन सांबर विहिरीत पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून उपचार केल्यानंतर त्याची सुखरूप सुटका केली असल्याची माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील निगडी येथील शिवारात असणार्‍या एका विहिरीमध्ये सांबर पडले असल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनी ही माहिती वन रक्षक राजू मोसलगी यांना दिली. त्यानंतर तात्काळ वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल 200 ते 225 किलो वजनाचा नर जातीचा सांबर विहिरीत पडला असल्याचे लक्षात येताच, त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तात्काळ मदतकार्य सुरू केले. दोरखंड व रेस्क्यू जाळीचा वापर करून मदत कार्य सुरू केले. रात्री साडेनऊ वाजता सांबराला बाहेर काढण्यात यश आले.
सांबर अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीत दिसून येत होते. त्याच्या अंगावर उबदार कपडे टाकून त्याला शांत करण्यात आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली आली. त्याच्या उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा फासा अडकल्याचे निदर्शनास आले. त्वरित त्याच्या पायातील फासा काढून टाकत त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. सांबराला जीवदान देण्यात वनविभागाचे वन क्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे, वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजू मोसलगी, सरपंच सुभाष शामराव पवार यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS