पुण्यात आजपासून ’मिनी लॉकडाऊन’जाहीर करण्यात आला आहे.
पुणे/प्रतिनिधी : पुण्यात आजपासून ’मिनी लॉकडाऊन’जाहीर करण्यात आला आहे. दुकानांना सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे; मात्र एकीकडे कोरोना रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असताना नागरिकांकडून तोबा गर्दी केली जात असल्याचे चित्र मार्केटयार्ड परिसरात पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पुण्यात कडक निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पुणेकरांनी थेट मार्केटयार्ड गाठले; मात्र याचदरम्यान नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे जाणवत होते. कारण किराणा भुसार बाजारात तोबा गर्दी जमा झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी अस्ताव्यस्त पार्किंग केल्यामुळे काहीवेळ या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. शहरातील किराणा दुकानांमध्येदेखील संचारबंदीमुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली असल्याचे निदर्शनास आले. कर्वेनगर, कोथरुड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता,प्रमुख पेठांमध्ये, मंडई परिसरातदेखील पुणेकरांची खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली दिसली. जीवनावश्यक खरेदीसाठी येथे नागरिकांना तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
COMMENTS