Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा

कराड तालुक्यातील किरपे येथील घटनेनंतर ग्रामस्थांचा संतापकराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात येणके येथील मुलगा दोन महिन्यांपू

गृह भेटीद्वारे वाई मतदार संघात वृध्दांसह दिव्यांग 139 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
घरासमोर झोपलेल्या तरूणाचा निर्घृण खून
उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज सुरूवात

कराड तालुक्यातील किरपे येथील घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप
कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात येणके येथील मुलगा दोन महिन्यांपूर्वी ठार झाल्याची घटना ताजी असताना काल अचानक किरपे येथे पाच वर्षीय राज देवकर या मुलावर बिबट्याने त्याचावर शेतात हल्ला केला. पोतले, घारेवाडी, येणके, किरपे, तांबवे, चचेगाव या परिसरात बिबट्याचा नियमित वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही बिबट्याने हल्ला केल्यानंतरच वनविभाग जागा होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करू लागले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या राज धनंजय देवकर याच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे. मात्र त्याच्या वडिलांसह नातेवाईकांनी बिबट्याच्या हल्ल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. वनविभागाने वेळीच उपाय योजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. कराड तालुक्यात बिबट्याकडून होणारे हल्ले आता नित्याचे होवू लागले आहे. हल्ला झाला की तेवढ्या वेळापूरता वनविभाग जागा होतो. इतर वेळी वनविभाग बिबट्या पकडण्यासाठी त्याच्या बंदोबस्त करण्यासाठी काय करतो काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
येणके येथे हल्ला झाला त्यात उसतोड कामगाराच्या सात वर्षीय मुलास आपला जीव गमावावा लागला. त्यावेळी वनविभाग चोवीस तास तळ ठोकून बसले होते. पिंजरे लावून किंवा वेब कॅमेरे लावून आठ दिवस अथक काम करून एक बिबट्या जेरबंद केला. मात्र, त्यानंतर नागरिकांना अनेक ठिकाणी अनेक वेळा बिबट्याचे परिसरात दर्शन होत आहे. संरक्षित क्षेत्र सोडून आता बिबट्या घरात आणि अंगणात येऊ लागला आहे. सर्वत्रच ग्रामपंचायत असो किंवा नागरिक यांनी वेळोवेळी वनविभागाला निवेदने देऊनही वनविभाग हात वरच करत आहे असे दिसत आहे.
गुरुवारी सायंकाळी किरपे येथील राज देवकर या पाच वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला मानेला पकडून बिबट्या घेऊन जाऊ लागला. सोबतीला त्याचे वडील धनंजय देवकर होते. त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यानंतर धनंजय देवकर यांनी क्षणार्धात बिबट्याचा पाठलाग केला. शेतातील तारेचे कंपाउंड जवळ बिबट्या थबकल्यानंतर देवकर यांनी तात्काळ राजचा पाय पकडून त्याला ओढायला सुरुवात केली. बिबट्या कंपाउंडला धडकल्यामुळे बिबट्याची पकड ढिली झाली. त्यामुळे राज धनंजय देवकर यांच्या हातात आला यावेळी आरडा-ओरडा करून धनंजय देवकर यांनी बिबट्याला पळवून लावले. या घटनेत राज याच्या मान, कान, हात, पाय व पाठीवर मोठ्या जखमा झाल्या आहेत. वनविभागाचे कर्मचारी पोलीस पाटील ग्रामस्थांच्या सहाय्याने राज याला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे या परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS