Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनादिवशी वारणावती वन्यजीव कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा

शिराळा / प्रतिनिधी : शासनाचे आदेश होऊन देखील विनोबाग्राम व मणदुर धनगरवाड्यावरील रहिवाशांच्या जमिनी व खुंदलापूर, जानाईवाडी या गावच्या पुनर्वसनाचा

मेकॅनिकल स्वपिंग मशीनमुळे पाचगणीतील रस्ते होणार चकाचक; स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत : पाच मेकॅनिकल मशीन पालिकेत उपलब्ध
मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

शिराळा / प्रतिनिधी : शासनाचे आदेश होऊन देखील विनोबाग्राम व मणदुर धनगरवाड्यावरील रहिवाशांच्या जमिनी व खुंदलापूर, जानाईवाडी या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न वन विभागाने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. याच्या निषेधार्थ वारणावती येथील वन्यजीव कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनादवशी ठरलेले आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे ग्रामस्थांनी वारणावती येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. बैठकीस माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक उपस्थित होते.
नाईक म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक अधिकार मिळालेल्या प्रजासत्ताक दिनादिवशी विनोबाग्राम व मणदुर धनगरवाडा, खुंदलापूर, जाणाईवाडी ग्रामस्थांचे अधिकार नाकारणार्‍या वन विभागाच्या निषेधार्थ आम्हाला आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत ग्रामस्थ आपल्या मुलाबाळांसह व गुराढोरांसह वन्यजीव कार्यालयासमोर धरणे देऊन बसणार आहोत.
यावेळी शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी उपसभापती एन. डी. लोहार, तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, मणदूर सरपंच वसंत पाटील, उखळू सरपंच राजाराम मुठल, गुढे सरपंच सखाराम दुर्गे, सोनवडे सरपंच रवी यादव, प्रकाश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट :
लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला.

COMMENTS