पत्नी रुग्णालयात, मुलाचं कोविडशी युद्ध, तरी हा माणूस उभा! ; जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नी रुग्णालयात, मुलाचं कोविडशी युद्ध, तरी हा माणूस उभा! ; जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

राज्यातील वाढती रुग्णसंख्या, कोरोनाला रोखण्यात आलेले अपयश आणि पुन्हा टाळेबंदीच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापार्‍यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्वीटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे.

धनगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार
कांदाप्रश्‍नी विरोधकांचा विधिमंडळात गोंधळ
लकडगंज परिसरात असलेल्या लाकडाचे कारखाने जळून खाक | LOK News 24

मुंबई/प्रतिनिधीः राज्यातील वाढती रुग्णसंख्या, कोरोनाला रोखण्यात आलेले अपयश आणि पुन्हा टाळेबंदीच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापार्‍यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्वीटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे. मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे; मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक पोस्ट लिहून ठाकरे यांच्या कार्याला सलाम केला. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात टाळेबंदीला विरोध करणार्‍या आणि टाळेबंदी केली, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणार्‍यांवर निशाणा साधत ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. इतरही विरोधकांनी ठाकरे यांना लक्ष्य केले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आव्हाड खंबीर पाठीराखे बनून उभे राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, तुमचे वजन वापरून, केंद्राकडून राज्याचे पैसे आणावे, असा खोचक टोलाही लगावला. त्यानंतर, आता त्यांनी ठाकरे यांच्या कार्याचे आव्हाड यांनी कौतुक केले. पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतो आहे. टीका करणे सोपे आहे; पण ठाकरे होणे अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असतानादेखील ज्या पद्धतीने ठाकरे महाराष्ट्र सांभाळत आहेेत… त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!!, असे भावनिक ट्वीट आव्हाड यांनी केले. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. सध्या रश्मी यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रश्मी ठाकरे रुग्णालयात आहेत, तर दुसरीकडे आदित्य यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

उद्धव यांच्या हृदयात स्टेन्स

उद्धव ठाकरे यांची दोनवेळा एन्जिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे ते आपल्या प्रकृती विषयी पूर्वीपासूनच जागरूक आहेत. ते नियमित व्यायाम करतात. डॉक्टरांच्या सतत संपर्कात असतात. त्यांच्या ह्रदयात अनेक स्टेन्स असतानाही ते ज्या धीरदोक्तपणे महाराष्ट्र सांभाळत आहेत, यावरुन आव्हाड यांनी उद्धव यांना सलाम केला आहे.

COMMENTS