अहमदनगर/प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध राहाता पोलिस ठाण्यात गुन
अहमदनगर/प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेश गायकवाड याने माझा नंबर नातलगाकडून घेतला. त्यानंतर मोबाईलवर, व्हॉट्सअॅपवर संभाषण व चॅटींग करीत होता. त्यास नाकारले तेव्हा त्याने हाताला दुखापत करून माझ्या मोबाईलवर मेसेज पाठवले. भीतीपोटी त्या तरुणीने ही बाब घरात कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर ऋषिकेशने जोडीदार मंगेश व अंकुश यांच्या साथीने त्या तरुणीचा पाठलाग केला. त्यानंतर त्या तरुणीने घरच्यांना हे तिघे त्रास देत असल्याचे सांगितले. ऋषिकेश मोबाईलवर प्रपोज करून लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व चॅटींग करत धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार करत असल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS