नगर अर्बनच्या आजी-माजी संचालकांना अजामीनपात्र वॉरंट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बनच्या आजी-माजी संचालकांना अजामीनपात्र वॉरंट

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या आजी-माजी संचालकांना अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने बजावले आहे. आज बुधवारी (19 जानेवारी) न्

नगर अर्बनच्या माजी संचालकांना खा. डॉ. विखेंचा पाठिंबा
टपाल खात्यामार्फत सूर्यघर योजनेचे सर्वेक्षण सुरु
कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांचा संगम म्हणजे स्व.शंकरराव काळे-उपमुख्यमंत्री

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या आजी-माजी संचालकांना अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने बजावले आहे. आज बुधवारी (19 जानेवारी) न्यायालयात हजर राहण्यास याद्वारे सांगण्यात आले आहे. 2015मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीस कोणी हजर राहात नसल्याने या सर्वांना अजामीनपात्र वॉरंट बजावल्याचे सांगितले जाते.
याबाबतची सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, 89 लाखांच्या गाड्यांचा लिलाव, सस्पेन्स अकौंटमधून पेमेंट, काष्टी शाखेतील सोनेतारण घोटाळा, मंत्र्यांच्या नावावर खोटा खर्च यासह अन्य काही मुद्यांच्या अनुषंगाने घडलेल्या घटनांबाबत लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षणात ताशेरे ओढले होते. त्यानंतर 2015मध्ये पोलिसात 1 कोटी 75 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता. त्यावेळी या प्रकरणात बँकेचे तत्कालीन सर्वेसर्वा व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी व (स्व.) सुवालाल गुंदेचा यांच्यासह आजी-माजी संचालक व अधिकारी-कर्मचारी मिळून 54जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासात यातील 18-19 नावे वगळण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत संबंंधित प्रकरणांशी त्यांचा संबंध नसल्याचे निष्पन्न झाले होते व त्यानंतर राहिलेल्या 34-35जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. त्यावेळी पहिल्या तारखेला सर्वजण हजर राहिले. पण नंतर एकत्रितपणे कोणी हजर राहात नसल्याने खटल्याच्या सुनावणीचे कामकाज होत नव्हते. मध्यंतरी कोरोना काळामुळे न्यायालयीन कामकाजावरही निर्बंध होते. पण मागील 5-6 तारखांपासून कोणी हजर राहात नसल्याने या खटल्याचे कामकाज होत नव्हते, त्यामुळे अखेर न्यायालयाने संबंधित सर्वांना अजामीनपात्र वॉरंट बजावले असून, बुधवारी (19 जानेवारी) न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, नगर अर्बन बँक सध्या विविध विषयांवरून चर्चेत असल्याने जुन्या प्रकारणातील अजामीनपात्र वॉरंट हाही चर्चेचा विषय झाला आहे.

COMMENTS