टेलिप्रोम्पटर बंद पडल्याने पंतप्रधान मोदी गोंधळले

Homeताज्या बातम्यादेश

टेलिप्रोम्पटर बंद पडल्याने पंतप्रधान मोदी गोंधळले

नवी दिल्ली/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रध

कोपरगावचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार
अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार
‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

नवी दिल्ली/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र त्यांच्या भाषणापेक्षा सध्या जास्त चर्चा होतीये ती या भाषणादरम्यान टेलीप्रॉम्प्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाची. पंतप्रधान मोदी बोलत असताना टेलीप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. या सार्‍या प्रकारामध्ये त्यांचा चांगलाच गोंधळ उडाल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदी भाषणे करताना टेलिप्रोम्पटरचा वापर करत असतात. यावेळी भाषणामध्ये पंतप्रधान मोदी बोलत असताना मध्येच थांबले. काही क्षण ते गोंधळले. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, यावर सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

COMMENTS