अहमदनगर जिल्ह्यातील 16 आदर्श शाळांना शासनाच्या विकास निधीची प्रतीक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील 16 आदर्श शाळांना शासनाच्या विकास निधीची प्रतीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2020-21 अर्थसंकल्पीय भाषणात राज्यात दीड हजार शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे जाहीर केले ह

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार व मनोरंजन कार्यक्रम
जम्मू काश्मीरमध्ये चार जवान शहीद
रामनवमी निमित्त वर्ध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

अहमदनगर/प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2020-21 अर्थसंकल्पीय भाषणात राज्यात दीड हजार शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर पहिल्या टप्प्यात मार्च 2021 मध्ये 500 शाळांची आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली. यात नगर जिल्ह्यातील 16 शाळाचा समावेश असून या शाळांना वर्षभरापासून विकासासाठी शासनाच्या निधीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून आतापर्यंत निधी न आल्याने जिल्हा परिषद पातळीवर या शाळांच्या विकासासाठी लोकसहभागातून निधी उभा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी यासाठी त्यांच्या सीएसआर फंडातून निधी द्यावा यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे.
2021 अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री पवार राज्यात दीड हजार शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 300 शाळांची यादी आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी अंतिमरित्या जाहीर करण्यापूर्वी 26 ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अभिप्राय घेण्यात आला. यात काही शाळा या योजनेतून वगळण्यात आल्या, तर काहींचा नव्याने सामावेश करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या 81 शाळा, कस्तुरबा बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळांचा यात समावेश करून पहिल्या टप्प्यात 500 शाळांची निवड करण्यात आली. यात नगर जिल्ह्यातून भोरवाडी (नगर), कळस बुुद्रक आणि वीरगाव (अकोले), देवदैठण (जामखेड), रेहकुरी (कर्जत), ढोत्रे (कोपरगाव), रेणुकानगर (मनपा), खुपटी (नेवासा), मिडसांगवी (पाथर्डी), गोल्हारवाडी (राहाता), कोंढवड (राहुरी), पिंपरी अजमपूर (संगमनेर), बालमटाकळी (शेवगाव), हंगेवाडी (श्रीगोंंदा), उक्कडगाव (श्रीरामपूर) येथील एकूण 16 जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. पण अद्यापपर्यंत या शाळांना शासनाकडून विकास निधी आलेला नाही.

अशा होणार सुधारणा
या शाळा आदर्श करताना त्या ठिकाणी आकर्षक इमारत, भविष्यात वाढत्या पटसंख्येनुसार नियोजन, शालेय प्रांगणात अंगणवाडी असणे अपेक्षित, विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुलां-मुलींसाठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हॅड वॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह व भांडार कक्ष, शैक्षणिक आणि खेळाचे साहित्य, ग्रंथालय आणि वाचनालय, संगणक कक्ष, शाळेत विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत, शाळेत अग्नीक्षमण यंत्रणा, शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक सुविधा, उत्कृष्ट शिक्षकांना देशातंर्गत आणि देशाबाहेर प्रशिक्षणासाठी पाठवणे आणि पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करून घेणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

COMMENTS