नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात अली असून, 15 जानेवारी रोजी, आर्मी डे परेड दरम्यान, सैनिकांसाठ
नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात अली असून, 15 जानेवारी रोजी, आर्मी डे परेड दरम्यान, सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशाचा पहिला देखावा प्रदर्शित केला जाईल. मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे केली आहे. डिजिटल नमुन्यांवर आधारित डिझाइन हे सैनिक तैनात असलेल्या विविध भूप्रदेशांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. सैनिकांना या गणवेशात आरामदायी वाटेल, याची काळजी घेण्यात आली आहे. सैनिकांच्या गणवेशासाठी नवीन डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध होणार नाही आणि ते अधिकारी आणि सैनिकांना त्यांच्या युनिटमधील तुकड्यांमध्ये दिले जातील. दरम्यान, तब्बल 13 लाख भारतीय सैन्याची कापड पुरवण्याची गरज पूर्ण करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांना खुली निविदा जारी करण्याची सरकराची योजना आहे. या कंपन्या या नवीन बॅटल ड्रेस युनिफॉर्म्स पुरवठा करतील. एका वरिष्ठ अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव, युनिफॉर्मसाठी नवीन डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध होणार नाही. म्हणजेच एकदा कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिल्यानंतर, वेगवेगळ्या आकाराच्या गणवेशांसाठी त्यांना ऑर्डर दिल्या जातील. नंतर ते गणवेश भारतीय सैन्याच्या विविध युनिट्स आणि फॉर्मेशन्सना पाठवले जातील आणि ते तिथे खरेदी करता येतील.
COMMENTS