वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करून खासदार, आमदारांनी रूग्णसेवेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दयावा – कोल्हे

Homeअहमदनगर

वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करून खासदार, आमदारांनी रूग्णसेवेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दयावा – कोल्हे

आजपर्यंतचा कोरोना आजाराचा आकडा पहाता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न करूनही दिवसागणिक कोरोबाधितांची संख्या वाढत आहे.

दैनिक लोकमंथन l देशमुखांचा राजीनामा; वळसे नवे गृहमंत्री
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला
बेलापूर बसस्थानकाच्या भिंतीची अज्ञाताकडून तोडफोड

कोपरगाव शहर प्रतिनिधी- आजपर्यंतचा कोरोना आजाराचा आकडा पहाता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न करूनही दिवसागणिक कोरोबाधितांची संख्या वाढत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असुन  खासदार आणि आमदारांनी रूग्णसेवेसाठी निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.आजपर्यंतचा कोपरगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आत्मपरिक्षण करायला लावणारा असुन अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, नागरीकांनी स्वतःची आणि कुटूंबाची काळजी घ्या परतू याबरोबरच कोरोना आजाराचा संसर्ग होणार नाही,यासाठी दक्ष रहाण्याचे आवाहन सौ कोल्हे यांनी केले आहे. देशासह राज्यामध्ये कोरोना संसर्गाचा झपाटयाने प्रसार होत आहे. तीच परिस्थिती जिल्हाभर असुन कोपरगाव तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शेकडयाच्या पटीत वाढणा-या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. कोणत्याही प्रकारची पुर्वतयारी केली नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असुन या आजाराच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठीची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. संशयित रूग्णांच्या तपासण्या होउन चाचणीचा अहवाल मिळत नाही, सदरचे रूग्ण विलगीकरण कक्षाची सोय नसल्यामुळे घरीच थांबतात, घरे छोटी असल्याकारणाने कुटूंबातील इतरांच्या संपर्कात येत असल्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे कोरोना रूग्णांसाठी दाखल करून घेण्यासाठी बेडची सुविधा नाही, या आजारामुळे गंभीर परिस्थिती झालेल्या रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची सुविधा नाही, आॅक्सीजन मिळत नसल्याने इतरत्र हलवले जाते, आर्थीक परिस्थितीमुळे मृत्युला सामोरे जाण्याची वेळ  येत असून अनेक कुटूंबातील तरूणांच्या जीवावर बेतले आहे. रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांनाही बाहेरून औषधेआणावी लागत असून मोठी आर्थीक कुचंबना होत आहे. अनेकांना रूग्णांला जगविण्याबरोबच कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठीही लढण्याची वेळ आली आहे.या सर्व परिस्थितीचा विचार करता रूग्णांना सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. व्हेंटीलेटर, आॅक्सीजन, औषधे, विलगीकरण कक्ष, रूग्णांसाठी जागा मिळत नसल्याने रूग्णांच्या भावनांशी खेळ चालला आहे, या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी कुठेच दिसत नाही. ही खेदाची बाब असुन खासदार, आमदारांनी यामध्ये तातडीेने लक्ष घालुन रूग्णसेवेसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दयावा, तालुक्यावर आलेल्या या संकटात जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सौ कोल्हे यांनी केली.

कोविड निर्मुलनासाठी मोहिम राबवा.
वाढती रूग्णसंख्या पहाता प्रषासनाने जनजागृती करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. तालुक्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याासाठी उपाययोजना कराव्यात, नागरीकांना नियम घालून दयावे, तसेच तालुक्यातून कोरोना हददपार करण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला  सहकार्य करण्याचे आवाहनही सौ कोल्हे यांनी केले.

COMMENTS