Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यात पत्रकार दिनी ऊसतोड मजुरांच्या बालकांना खाऊ वाटप

पाटण / प्रतिनिधी : पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस राज्यभर पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला. पाटण तालुका

चिमणी दिनानिमित्त मुक्तांगणच्या प्रांगणात घरटी बनविताना चिव-चिवाट
सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला
मणदुरच्या काऊदर्‍यावर जानाई-मल्हारच्या साक्षीने निसर्गपूजा उत्साहात

पाटण / प्रतिनिधी : पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस राज्यभर पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला. पाटण तालुका पत्रकार संघातर्फे या वर्षी वेगळापणा जपत उसतोड मजूर व त्यांच्या मुलांना खाऊ भरवून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
अलिकडच्या काळात पत्रकार दिन म्हणजे राजकीय नेते पुढारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्या सोबत स्व. बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रतिमेला पुष्पहार घालणे ऐवढेच होताना दिसत आहे. मात्र, पाटण तालुका पत्रकार संघाने नेहमीप्रमाणे सामाजिक बांधीलकी जपत व आपले वेगळेपण राखत पत्रकार दिनी. उपजिविकासाठी पालात राहून उसतोड मजुरी करणार्‍या मजुरांच्या बालकांना उसाच्या फडात जाऊन पोषण आहार खाऊ वाटप करुन पत्रकार दिन साजरा केला. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तत्पूर्वी प्रांभीस पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात दर्पणकार जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार रमेश पाटील यांनी उपस्थित राहून जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी संघाचे ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण, संपतराव देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र माने, उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, जालिंदर सत्रे, शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, विद्या म्हासुणेॅकर-नारकर, संजय कांबळे, निलेश साळुंखे, प्रवीण जाधव, राजेंद्र सावंत, सुरेश संकपाळ, नाना पवार, गजानन पोतदार, के. डी. चव्हाण, श्रीगणेश गायकवाड, प्रकाश कांबळे, सिताराम पवार उपस्थित होते.

COMMENTS