औषधांची मागणी वाढली; बदलत्या वातावरणाचा परिणाम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औषधांची मागणी वाढली; बदलत्या वातावरणाचा परिणाम

अहमदनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली असून वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. करोना बाधितांची संख्या देख

रेणुका आश्रमात पंचेचाळीसावा शारदीय नवरात्र महोत्सव
कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसाआड पूर्ववत करावा
चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

अहमदनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली असून वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. करोना बाधितांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक रूग्णालयात जाण्याचे टाळत असून मेडिकल स्टोअर्समध्ये सर्दी खोकल्याच्या औषधांना मागणी वाढली आहे. देशात व राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपा प्रशासनाकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मनपा आरोग्य विभागाकडून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरूवात झालेली आहे. या लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सर्दी व खोकल्याचा त्रास झालेले अनेक जण रूग्णालयात जाण्याचे टाळत असून मेडिकल दुकानातूनच औषध घेण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्दी व खोकल्याच्या औषधांना मागणी वाढली आहे.  दरम्यान, अनेकांना सर्दी व खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे हा त्रास होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

COMMENTS