Homeताज्या बातम्याशहरं

मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया महिनाअखेर होणार

सातारा / प्रतिनिधी : सातारकरांचे लक्ष लागलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमिपूजन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पव

फलटण नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण; स्थानिक नागरिकांचा उपोषणाचा इशारा
त्रिशंकू भागातील पथदिवे बंद ठेवून विज बचतीचा सातारा नगरपरिषदेकडून संदेश
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी; मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानचे वक्तव्याने अडचणींत वाढ

सातारा / प्रतिनिधी : सातारकरांचे लक्ष लागलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमिपूजन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. इमारती कामासाठी 495 कोटींच्या सुसज्ज आराखड्यास वैद्यकीय संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जानेवारी अखेर टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. एकूण चार टप्प्यांत हे बांधकाम होणार आहे. साधारण मार्चमध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. या बांधकामावर निरीक्षण करण्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहणार आहे.
सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया यंदापासून होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मागील आठवड्यात झाले आहे. त्याचे काम वेगाने होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा एकूण 495 कोटी रुपयांचा इमारत बांधकाम आराखडा तयार झाला आहे. आराखड्यास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी मान्यता दिली आहे. बारामती व दिल्ली वैद्यकीय महाविद्यालयांच्या धर्तीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीचे विशेष आकर्षण राहणार आहे. आराखड्यातील बांधकामे चार टप्प्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षणाखाली होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील. साधारण मार्चपर्यंत प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होण्याची शक्यता वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. आर. डी. चव्हाण यांनी व्यक्त केली.
इमारतीच्या बांधकामाची 495 कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या अखेरीस काढण्यात येणार आहे. सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी दिग्गज कंपन्या टेंडर प्रक्रियेत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांशी संबंधित राजकीय नेते मंडळी टेंडर आपल्याशी संबंधित कंपनीला मिळावे यासाठी वजन वापरणार आहेत.

COMMENTS