आरोपी पलायनप्रकरणी राहुरीचे पोलिस निरीक्षक इंगळे निलंबित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोपी पलायनप्रकरणी राहुरीचे पोलिस निरीक्षक इंगळे निलंबित

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी येथील पोलिस कारागृहातून मोक्का गुन्ह्यातील अटकेत असलेल्या गुन्हेगारांसह पाच आरोपींनी पलायन केले होते. या प्रकरणी एका पोलिस

पाटणकर विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची सांगता
श्रद्धा धाडीवाल या मुलीने रेखाटली जिवंत रांगोळी
प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी येथील पोलिस कारागृहातून मोक्का गुन्ह्यातील अटकेत असलेल्या गुन्हेगारांसह पाच आरोपींनी पलायन केले होते. या प्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह सहा जणांना याआधीच निलंबित करण्यात आले आहे. आता याच प्रकरणात राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना जबाबदार धरुन त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. बुधवारी (दि.5) पोलिस उपमहानिरीक्षकांनी हे आदेश काढले असल्याचे त्यांनी सांगितले.

17 डिसेंबर रोजी मध्यरात्री राहुरी पोलिस ठाण्यातील कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून पाच आरोपींनी पळ काढला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यातील तिघांना पोलिसांनी तात्काळ पकडले होते. तर दोन जण फरार झाले होते. ते अजूनही सापडू शकलेले नाही. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस अधीक्षक पाटील यांनी अहवाल मागविला होता. त्यानुसार श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांनी राहुरी कारागृहास समक्ष भेट देऊन पाहणी केली. काहीजणांचे जबाबही त्यांनी घेतले होते. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय बाबुराव राठोड, पोलिस कॉन्स्टेबल बाळू एकनाथ चाबूकस्वार, पोलिस नाईक संजयकुमार मोहनराव जाधव, महिला पोलिस कॉन्स्टेबल मनीषा सुभाष गुंड, पोलिस नाईक रोहिदास मारुती गुंडाके या सहा जणांना यापूर्वीच निलंबित केले आहे.

त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल पोलीस अधीक्षक पाटील यांनी पुढील कारवाईसाठी पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठवला होता. चौकशी अहवालानुसार या प्रकरणामध्ये राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या अहवालानुसार पोलिस उपमहानिरीक्षकांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निलंबित केले असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

COMMENTS