Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर पहिले विश्‍वात्मक संत साहित्य संमेलन लांबणीवर

कोल्हापूर : ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर येथे नियोजित पहिल्या विश्‍वात्मक संत साहित्य संमेलनाच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्वप

पालिकेची निवडणुक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार : सदाभाऊ खोत
त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रातील घटना लाजिरवाणी : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री
मसूर-उंब्रज परिसरात 42 लाखाला गंडा घालणारे दोघेजण ताब्यात

कोल्हापूर : ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर येथे नियोजित पहिल्या विश्‍वात्मक संत साहित्य संमेलनाच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच नवीन तारखा जाहीर केल्या जाणार असून येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये संमेलनाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ किर्तनकार मदन महाराज गोसावी, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, 14 ते 16 जानेवारीदरम्यान हे संमेलन नियोजित होते.
विश्‍वबंधूत्वाची शिकवण संत परंपरेने दिली आणि कोरोनाच्या काळात खर्‍या अर्थाने प्रत्येकाला ती अनुभवायला मिळाली. संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील संत साहित्यावर मंथन होणार आहे. मारूती महाराज कुरेकर यांना निष्ठावंत वारकरी जीवनगौरव तर हरिव्दार येथील महंत ऋषीश्‍वरानंदजी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. सतरा देशांचे राजदूत पूर्णवेळ संमेलनात ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
संत साहित्य आणि पर्यावरण, संत साहित्य आणि लोकत्व, अस्वस्थ वर्तमानात संत विचारांची भूमिका आदी विषयावर परिसंवाद होतील. भक्तिसंप्रदाय आणि विश्‍वात्मकता या परिसंवादात विविध पंथ, संप्रदायांवर विचारमंथन होणार आहे. त्यातील वक्त्यांबरोबरच देशभरातील विविध भक्ती संगीताचे कार्यक्रम निश्‍चित झाले आहेत. नियोजित संमेलन पुढे होणार असले तरी संमेलनातील एकूणच कार्यक्रमांची रूपरेषा निश्‍चित झाली असून त्यानुसारच पुढील संमेलन होईल.

COMMENTS