Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदोलीचे पर्यटन आजपासून तीन दिवस बंद

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण आजपासून दि. 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी असे तीन दिवस पर्यटकांसाठी ब

‘पीएम किसान’, ‘नमो शेतकरी’साठी साडेतेरा लाख शेतकरी पात्र
आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
महाबळेश्‍वर तालुक्यात मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण आजपासून दि. 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी असे तीन दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. याची चांदोलीमध्ये येणार्‍या पर्यटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व धरण व्यवस्थापनचे उपविभागीय अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी केले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देताना तसेच नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक पर्यटक चांदोली परिसरात येतात. यामध्ये काही पर्यटक अतिउत्साही असतात. त्यामुळे त्यांचा दंगा, गोंगाट, जल्लोषामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील वन्यजीव तसेच वन्यजीवांची आश्रयस्थळे यांना धोका पोहोचवला जातो. उद्यानातील वन्यजीवांना होणारा धोका टाळण्यासाठी तसेच धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. शनिवार, दि. 2 पासून धरण व अभयारण्य पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याची पर्यटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोली वन्यजीव विभाग तसेच धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

COMMENTS