अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठरणार नवा अध्यक्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठरणार नवा अध्यक्ष

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नव्या विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होऊ शकलेला नाही.यासंदर्भात राज्यपालांनी सरकारला पत्र दिले आहे. त्यानंत

६०० बैलजोड्या आणि हजारो प्रेक्षक पहा बैलगाडा शर्यत
बाल चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणे काळाची गरज
राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेचा मनमानी कारभार

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नव्या विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होऊ शकलेला नाही.
यासंदर्भात राज्यपालांनी सरकारला पत्र दिले आहे. त्यानंतरच्या घडामोडीत विधानसभा अध्यक्षांची निवड अनिर्णीत राहिली. दरम्यान याबाबत मार्च 2022 मध्ये प्रस्तावित असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबबात निर्णयाची शक्यता वर्तवली जातेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून हे पद रिक्त आहे. नवीन अध्यक्षासाठी आवीजी मतदान पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अशा प्रकारे पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी पद्धतीने होणार असल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली होती. राज्य सरकारचा आपल्याच आमदारांवर विश्वास नसल्याची टीका विरोधकांनी सुरू केली होती. मात्र, संसदेमध्ये अध्यक्षांची ज्या पद्धतीने निवड होते, तशीच प्रक्रिया आपण राज्यात करत असल्याची बाजू राज्य सरकारने मांडली होती. अशा प्रकारे निडणूक घेण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवला होता. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी 28 डिसेंबर अर्थात मंगळवारचा दिवस देखील नक्की करण्यात आला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून राज्य सरकारने निवडणूक घेण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव देखील सोमवारी राज्यपालांना पाठवला होता. मात्र, त्यावर राज्यपालांची मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे नेमकी निवडणूक होणार की नाही..? याविषयी चर्चा सुरू झाली होती.

COMMENTS