अखेर शिक्षकांना मिळणार त्यांच्या हक्काचे पैसे ; बीडीएस प्रणाली झाली सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर शिक्षकांना मिळणार त्यांच्या हक्काचे पैसे ; बीडीएस प्रणाली झाली सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यभरातील बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे पीएफ धारक मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पैशापासून व

भाजपच्या नव्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सत्कार
रामनाथ भोजने यांचा वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मान
अहमदनगर मध्ये मयत झालेल्या माणसांच्या रक्षा,अस्तीचा काळाकारभार | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यभरातील बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे पीएफ धारक मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित होते. मात्र, आता त्यांना दिलासा मिळाला आहे. बंद असलेली बीडीएस प्रणाली पुन्हा सुरू झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षक भारतीच्या यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे. पीएफ धारक मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैयक्तिक कामे, मुलांच्या लग्नांसाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, गृह कर्ज हप्ता भरण्यासाठी स्वतःच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून पैसे मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, राज्यभरातील बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नव्हते. ही प्रणाली आता सुरू झाल्याने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातील हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांचे पैशांअभावी रखडलेले अनेक प्रश्‍न सुटतील. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षक वर्गात स्वागत होत आहे.
राज्यभरातील बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच हाती पैसे नसल्याने त्यांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत असल्याने आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले व यासाठी वारंवार पाठपुरावा केला. तसेच वित्त सचिवांना वारंवार भेटून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना येणारी अडचण मांडली. त्यानंतर ही ऑनलाइन देयकाची बी.डी.एस. प्रणाली सुरू झाली. त्यामुळे आता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे आता मिळणार आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली. या मागणीसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनीही पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS