कोरोनाचा उद्रेक ! पारनेरमध्ये 52 विद्यार्थी बाधित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाचा उद्रेक ! पारनेरमध्ये 52 विद्यार्थी बाधित

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे सावट असतांनाच, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील नवोदय विद्यालयांत 52 विद्यार्थी कोरोनाबा

लैंगिक शोषण करणार्‍यांविरोधातील उपोषणास दाद मिळेना…
सदगुरू शुक्राचार्य मंदिरामुळे कोपरगावची ओळख ः विवेक कोल्हे
संजय राऊत यांना थोडी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या – नितेश राणे 

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे सावट असतांनाच, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील नवोदय विद्यालयांत 52 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख घसरत असतांनाच एका शाळेमध्ये एवढया मोठया प्रमाणावर विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून, रविवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर टाकळी ढोकेश्‍वर येथील नवोदय विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना योग्य ती काळजी घेऊन कोरोना नियमांचे पालन करण्याची ताकीद दिली.
जवाहर नवोदय विद्यालयात 24 डिसेंबर रोजी काही विद्यार्थ्यांना कोरोना सदृश्य लक्षणीय असल्याने तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन शिक्षक, एक सफाई कामगार व आणि 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षकांची चाचणी करण्यात आली. तसेच विद्यालयातील काही शिक्षक गावात राहत होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील शोधून त्यांची चाचणी करण्यात आली. एकूण 406 विद्यार्थी व 50 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 52 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान प्रशासनाने माहिती दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांपैकी शुक्रवारी 27 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर शनिवारी आणखी 25 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. पहिल्या दिवशी 19 आणि रविवारी मिळालेल्या अहवालात 52 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या 71 इतकी झाली आहे. दरम्यान विद्यालयांमध्ये उपाययोजना तातडीने राबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले प्रत्यक्ष भेट देत तशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, एवढया मोठया प्रमाणावर विद्याथ्यी कोरोनाबाधित झाल्यामुळे पालक व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, अशा आपल्या पाल्यांना घरी सोडण्याबाबत शाळा प्रशासनाकडे विनंती केली आहे. मात्र ती मान्य करण्यात आली नसून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे पालकांशी संवाद साधत त्यांच्यावर योग्य उपचार करणार असल्याची माहिती दिली.

पालक आणि प्रशासनाची चिंता वाढली
टाकळी ढोकेश्‍वरमध्ये 52 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यामुळे पालक आणि प्रशासनाची देखील चिंता वाढली असून, जे 410 विद्यार्थी निगेटिव्ह आलेत त्यांना घरी सोडण्याची विनंती पालकांनी केली. मात्र विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घेण्यात येत असून, त्यांना लगेच घरी सोडता येणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांवर उपचार केले जात असून, तसेच ज्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्या विद्यार्थ्यांची देखील काळजी घेता यावी म्हणून त्यांना नवोदय विद्यालयात वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या मुलांना त्यांच्या घरी सोडल्यास समाजातही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून जावू नये, प्रशासन विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेत असून, त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहे.
जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र भोसले

COMMENTS