मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील नियमांमध्ये बदल करत, हा प्रस्ताव संमत
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील नियमांमध्ये बदल करत, हा प्रस्ताव संमतीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हा प्रस्ताव स्वीकारणार की नाकारणार, याकडे सर्वंपक्षीयांचे लक्ष लागले आहे. कारण उद्या होणार्या निवडणुकीचे भवितव्या या निर्णयावर अवलंबून असेल.
सध्या राज्यात सुरू असलेला राज्यपालविरुद्ध राज्य सरकार संघर्षाचा सामना बघता राज्यपाल महाविकास आघाडी सरकारने पाठवलेला प्रस्ताव कितपत स्वीकारतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रस्ताव न स्वीकारत परत पाठवला, तर मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट घेऊन नवीन प्रस्ताव मंजूर करावा लागेल आणि कॅबिनेटने मंजूर केलेला प्रस्ताव पुन्हा एकदा राज्यपालांकडे पाठवावा लागेल. हा प्रस्ताव राज्यपाल स्वीकारणार की नाकारणार यावर विधान सभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याने हे पद कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला आणि शिवसेनेकडील वन खाते काँग्रेसला असा बदल होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नसून आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे या चर्चेत आहेत. त्यातही भोरचे आमदार थोपटे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असताना काल एक ट्विस्ट आला आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राऊत यांचा कार्यकाळ संपला. त्यांना या पदावर पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राऊत यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
COMMENTS