बोईसर येथील हरवलेल्या विद्यार्थिनीचा तपास गुन्हे शाखेकडे देणार : गृह राज्यमंत्री सतेज पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोईसर येथील हरवलेल्या विद्यार्थिनीचा तपास गुन्हे शाखेकडे देणार : गृह राज्यमंत्री सतेज पाटील

मुंबई, दि. 23 : बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडे देणार आहे. या विद्यार्थिनीचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी मुंब

नर्सरीतील मुलाने तिसरीच्या विद्यार्थ्यावर झाडली गोळी
मिचाँग चक्रीवादळापूर्वीच फटका
आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.

मुंबई, दि. 23 : बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडे देणार आहे. या विद्यार्थिनीचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात येणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली.
सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी ही परिक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे बॅण्ड स्टँडवरुन दिवसाढवळ्या गायब झाल्याचे 29 नोव्हेंबर, 2021 मध्ये उघडकीस आल्याचे सांगितले. या घटनेला 15 दिवस उलटूनही अद्याप तरुणीचा शोध लागलेला नाही याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सर्वश्री गोपिचंद पडळकर, रमेशदादा पाटील यांनीही सहभाग घेतला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी गृह विभागाचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहे. हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे द्यावा अशी मागणी लक्षात घेता तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येईल. राज्यात हरवलेल्या मुली अथवा मुलांसाठी मुस्कान हे ऑपरेशन राबविण्यात येते. आतापर्यंत गृह विभागाने अनेक हरवलेल्या मुला-मुलींना त्यांचे स्वत:चे घर पुन्हा मिळवून दिले आहे. शासन महिलांच्या प्रश्नाबाबत सजग असून महाविद्यालय स्तरावरही महिलांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरेही वाढविण्यात येत आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी फेसबुक तसेच इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांच्या संदर्भातही सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या पालकांना द्यावयाच्या मदतीबाबतही आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित उपप्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

COMMENTS